रात्र पुनवेची आज ।
नभी चांदोबा डौलात ।।१।।
रातराणीचा सुगंध मोहक।
चंदेरी प्रकाश परसात।।२।।
शितल वारा झोंबतो अंगी।
पहाटेची झोप उडवितो।।३।।
मदन उधळीत कान्हा ।
नकळत कुशीत शिरतो।।४।।
चंद्र हसतो लाजुन ।
लपतो ढगात क्षणात ।।५।।
स्वर छेडीता बासरीचे ।
राधा हरपली मनात ।।६।।
नकळत लुटला सुगंध ।
दवबिंदु चाखुन घेवुन।।७।।
कान्हा माझा जीवलगा ।
जीवमाझा घेतला चोरुन।।८।।
पहाटेची वेळ उषाराणी दारात।
म्हणे चंद्र माझा शोधीते।।९।।
पाहीला का माझा सखा।
मी वाट पहाते पुनवेची।।१०।।
सुभाष मोरे / धुळे
६ मार्च २०१५
कवीता आवडल्यास लाईक/ कॉमेट करा
नभी चांदोबा डौलात ।।१।।
रातराणीचा सुगंध मोहक।
चंदेरी प्रकाश परसात।।२।।
शितल वारा झोंबतो अंगी।
पहाटेची झोप उडवितो।।३।।
मदन उधळीत कान्हा ।
नकळत कुशीत शिरतो।।४।।
चंद्र हसतो लाजुन ।
लपतो ढगात क्षणात ।।५।।
स्वर छेडीता बासरीचे ।
राधा हरपली मनात ।।६।।
नकळत लुटला सुगंध ।
दवबिंदु चाखुन घेवुन।।७।।
कान्हा माझा जीवलगा ।
जीवमाझा घेतला चोरुन।।८।।
पहाटेची वेळ उषाराणी दारात।
म्हणे चंद्र माझा शोधीते।।९।।
पाहीला का माझा सखा।
मी वाट पहाते पुनवेची।।१०।।
सुभाष मोरे / धुळे
६ मार्च २०१५
कवीता आवडल्यास लाईक/ कॉमेट करा
Comments
Post a Comment