हेल्दी खा, फिट राहा!

आपल्यापैकी बरेच जण चवीन खाणारे असतात. पण ते जे पदार्थ खातात ते कितपत पौष्टिक असतात? या पदार्थांमुळे चमचमीत खाण्याची इच्छा पुरवली जात असली तरी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम हे होतच असतात. आजारांपासून स्वत:ला वाचवायचं असेल तर आहार योग्य असणं अत्यंत आवश्यक असतं. आहारतज्ज्ञांनी योग्य आहाराचे पाच गट बनवले आहेत. त्यापैकी एक किंवा इतर गटांचं कॉम्बिनेशन बनवून आपण पौष्टिक आणि सकस आहार घेऊ शकतो.

चवीने खाणाऱ्यांची संख्या कमी नाही पण शरीराला ऊर्जा पुरवणारा पौष्टिक आहार किती जण घेतात? योग्य आहारामुळे शरीर नेहमीच 'शेप'मध्ये राहतं. त्याचबरोबर त्वचा, केस, डोळे, नखंही निरोगी राहतात. अशा आहाराने दररोजच्या कामांसाठी पुरेशी ऊर्जा मिळतेच शिवाय व्यायाम करण्यासाठी आवश्यक असणारी 'एक्स्ट्रा' एनजीर्ही मिळते. योग्य आहारामुळे स्मरणशक्ती चांगली राहते, एकाग्रता वाढते आणि मूडही चांगला राहतो. चांगल्या आहारामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून आपण बचावतो.

योग्य आहारामुळे हे फायदे मिळतातच परंतु अनेक 'लाँग टर्म' फायदेही मिळतात. जसं स्थूलपणा, मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, स्ट्रोक, हाडं ठिसूळ बनणं या तसंच वाढत्या वयाबरोबर होणाऱ्या इतर आजारांनाही दूर ठेवता येतं. योग्य आहारामुळे वय वाढलं तरी आपण फिट आणि निरोगी राहतो.

योग्य आहाराचे असे अनेक फायदे पाहिल्यानंतर आपल्या मनात सर्वप्रथम येणारा प्रश्ान् म्हणजे; योग्य आहार म्हणजे नेमकं काय? त्यात कोणत्या पदार्थांचा समावेश होतो? आहार म्हणजे आपल्या शरीराचं इंधन. त्यामुळे योग्य तेच इंधन आपल्या पोटात जायला हवं. आहारतज्ज्ञांनी हे काही फूड ग्रुप तयार केले आहेत. प्रत्येक ग्रुप पौष्टिक घटकांनी भरलेला आहे. आवडीप्रमाणे त्यातला कोणताही एक गुप किंवा त्यांचं कॉम्बिनेशन निवडता येतं.

Comments